'एसआयआर' मोहिमेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

Foto
मंत्री उदय सामंत २१ मेपासून जिल्हा दौऱ्यावर
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आगामी एसआयआर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाची जिल्हास्तरीय संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत हे २१ आणि २२ मे रोजी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी दिली.
२१ मे रोजी सकाळी ११ वाजता शहराच्या पूर्व, पश्चिम आणि मध्य संभाजीनगर विधानसभा मतदारसंघांची
संयुक्त बैठक संत एकनाथ नाट्यगृहात होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता गंगापूर विधानसभा मतदारसंघाची बैठक माहेश्वरी मंगल कार्यालयात, तर सायंकाळी ५ वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघाची बैठक सेना भवन वैजापूर येथे पार पडणार आहे.
२२ मे रोजी सकाळी अकराला कन्नड विधानसभा मतदारसंघाची बैठक डी.एल. सभागृह, कन्नड येथे होईल. दुपारी २ वाजता सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची बैठक सेना भवन सिल्लोड येथे होणार असून, सायंकाळी ५ वाजता फुलंब्री आणि पैठण विधानसभा मतदारसंघाची संयुक्त बैठक आदिती मंगल कार्यालयात होईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions